
ऍड. दुष्यंन्त शिंगटे म्हणजे जणू काही जॉली एल एल बी चित्रपटातील अर्षद वारसी !!
ऍड. दुष्यंन्त शिंगटे म्हणजे जणू काही जॉली एल एल बी चित्रपटातील अर्षद वारसी !!
एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेले बाबा नोकरीपेशात, आई गृहिणी, करी रोड डिलाईड रोड मुंबई सारख्या मराठमोळ्या विभागात जन्मापासून राहणारे.
अतिशय तत्वनिष्ठ, अन्यायाविरोधात पेटून उठणारे, कायद्याबद्दल प्रचंड आदर व माहिती असणारे, खूप मेहनती, बुद्धिजीवी, अवांतर वाचन करणारे, इतिहासाबद्दल खूप आवड व माहिती असणारे, मराठा समाजाबद्दल प्रेम व आदर असणारे, इंग्रजी भाषेवर खूप प्रभुत्व असणारे, असंख्य इंग्रजी साहित्य चाळून काढणारे, बातमीकर या लोकप्रिय ऑनलाइन वृत्तपत्राचे सहकारी, पत्रकारांबद्दल आदर असणारे, अतिशय हजरजबाबी, निर्भीड व्यक्तिमत्त्व म्हणजेच ऍड. दुष्यंत सदाशिव शिंगटे.
श्री. शिंगटे यांनी आपलं शालेय व महाविद्यालयीन उच्च शिक्षण मुंबईतुन पूर्ण केले, त्यानंतर त्यांनी अन्यायाने पीडित झालेल्या गोरगरिबांना न्याय मिळावा त्यांना न्यायालयीन मदत मिळावी म्हणून आंबेडकर लॉ कॉलेज वडाळा येथून एल एल बी चे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.
घरची परिस्थिती तशी बेताचीच त्यातून शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून लोअरपरेल खामकर मंडई येथून स्वतःचा कॉस्मेटिक चा व्यवसाय शिंगटे यांनी केला, एकीकडे ग्राहकांना सेवा पुरवायची आणि त्यातून वेळ काढून कायद्याच्या जाडजूड पुस्तकांचा अभ्यास करायचा. अतिशय कठीण परिस्थितीत, मोठ्या कष्टाने, तब्बल दोन वेळा परिक्षेच्या आधी गंभीर आजारी असताना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून देखील शिंगटे यांनी एल एल बी ची परीक्षा दिली व ती पहिल्या फेरीतच प्रथम श्रेणीतुन पास झाले.
एल एल बी झालेल्या शिंगटे यांना अमेरिकन लॉ कंम्पनीने त्यांची हुशारी पाहून आपल्या कंपनीत रुजू करून घेतले, पण आता २०२१ साली त्यांनी मुंबई उच्च नायालयातून खटले चालविण्यासाठी बार कौन्सिल येथून सनद घेतली.
बऱ्याचदा न्यायालयात गोरगरिबांना न्याय मिळवण्यासाठी खूप वेळ घालवावा लागतो तर कधीतरी काही लबाड वकिलांवर बराच पैसा खर्च करावा लागतो, यामुळे मानाचा समजला जाणारा वकिली पेशा बदनाम होत चालला आहे.
याबाबत वकिली पेशा ला उजळून काढायचे आहे व स्वच्छ प्रतिमेची वकिली मुंबईत चालली पाहिजे, त्यासोबत सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे असे मत ऍड दुष्यंत शिंगटे यांनी व्यक्त केले आहे.
याबद्दल शिंगटे यांचे बातमीकर ऑनलाइन वृत्तपत्रातर्फे मनपूर्वक अभिनंदन!!