
हनीवेलने मुंबईत स्थापन केले, कोविड क्रिटिकल केअर सेंटर !!
हनीवेलने मुंबईत स्थापन केले, कोविड क्रिटिकल केअर सेंटर !!
कंपनीने भारतात कोविड-19 साठी केलेल्या या वर्षासाठीच्या 18 कोटी रुपयांच्या तरतुदीतून या नवीन ‘क्रिटिकल केअर सेंटर’ची केली उभारणी.
• मुंबईत दहिसर येथील ‘कोविड जंबो सेंटर’मध्ये कोविडच्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेला सुसज्ज असा हा अतिदक्षता विभाग राज्य सरकारकडे सुपूर्द.
• 120 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स, एन-95 रेस्पिरेटर्स आणि पीपीई किट यांचे महाराष्ट्रभर वितरण करण्यासाठी दान.
कोविडच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील दहिसर ‘कोविड जंबो सेंटर’मध्ये अतिदक्षता विभाग (आयसीयू) हनीवेल कंपनीतर्फे सुरू करण्यात आला आहे. कंपनीने आज ही घोषणा केली. ‘हनीवेल’तर्फे देशात चालविल्या जाणाऱ्या कोविड रिलीफ उपक्रमांचा भाग म्हणून उभारण्यात आलेली ही दुसरी सुविधा आहे. कंपनीने यापूर्वी कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे अशीच एक सुविधा स्थापन केलेली आहे, तसेच अनेक शहरांमध्ये पाच कोविड केअर सेंटर्स सुरू केली आहेत. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र राज्यातील रुग्णालयांसाठी 120 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, व्हेंटिलेटर, एन-95 रेस्पिरेटर आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) यांसह अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य देणगीदखल दिले आहे.
यापूर्वी मे महिन्यात हनीवेलने पुण्यातील बिबवेवाडी येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयात 20 खाटांचे कोविड केअर सेंटर स्थापन केले होते. ऑगस्टच्या अखेरीस शहरात कोविड बालरोग केंद्र स्थापन करण्याचीही योजना कंपनीने आखली आहे.
"हनीवेलसारख्या कंपन्या पुढे येत आहेत आणि राज्याच्या आरोग्यसेवेत पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने सरकारला पाठिंबा देण्यासाठी उद्योगांना प्रेरणा देत आहेत, हे पाहून आम्हाला आनंद होत आहे," असे उद्योग, खाण आणि मराठी भाषा या खात्यांचे मंत्री सुभाष रा. देसाई म्हणाले.
"दहिसरचे हे कोविड जंबो सेंटर आणि पुण्यात पूर्वी स्थापन करण्यात आलेले कोविड केअर सेंटर येथे साथीच्या काळात अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविल्या जातीलच, त्याशिवाय, राज्याच्या भविष्यातील गरजांसाठी आरोग्यसेवांची क्षमता त्यातून वाढेल," असे ते म्हणाले.
मुंबईतील 10 खाटांच्या आयसीयूमध्ये कोविड-19च्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठीची आवश्यक उपकरणे आहेत. यामध्ये ‘क्लास 1’ची 5 व्हेंटिलेटर्स, फाऊलर बेड्स, बायपॅप मशीन, कॅप्नोमीटरसह आणि त्याशिवायची मल्टीपॅरा मॉनिटर्स, एक पोर्टेबल एक्स-रे मशीन, एक ईसीजी मशीन, एक इन्फ्युजन पंप आणि एक लॅरिन्गोस्कोप सेट यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, येथे ‘एन-95 रेस्पिरेटर्स’ आणि किट्स यांचाही पुरवठा हनीवेल येथे करणार आहे.
"हनीवेलने भारतात कोविडमुक्तीसाठी 22 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तसेच कोविडच्या साथीचा सामना करण्यासाठी अनेक राज्ये व स्थानिक सरकारांशी भागीदारीही केली आहे," अशी माहिती ‘हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘हनीवेल इंडिया’चे अंतरिम अध्यक्ष आशिष गायकवाड यांनी दिली.
“आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, हरयाणा व उत्तराखंड या राज्यांतील सहा शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स आणि क्रिटिकल केअर सेंटर्सची स्थापना केली आहे. आम्ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, व्हेंटिलेटर, एन95 रेस्पिरेटर्स आणि पीपीई किट यांसारखी अत्यावश्यक वैद्यकीय सामग्रीदेखील देणगीदाखल देत आहोत,” असे गायकवाड यांनी नमूद केले.
‘हनीवेल’ने मुंबईप्रमाणेच बंगळुरूमध्ये 10 खाटांची आयसीयू सुविधा उभारली आहे, कंपनीने दिल्ली, पुणे, गुरुग्राम आणि नैनीतालमध्ये 20 खाटांची कोविड केअर सेंटर्स सुरू केली आहेत. ही केंद्रे संबंधित स्थानिक आणि राज्य सरकारांद्वारे चालवली जात आहेत. गंभीर नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड, ऑक्सिजन पुरवठा, पीपीई किट, वैद्यकीय सामग्री आणि मूलभूत वैद्यकीय पायाभूत सुविधांनी ही केंद्रे सुसज्ज आहेत.
आजपर्यंत ‘हनीवेल’ने देशभरातील विविध सरकारी आणि खासगी रुग्णालयांना 1,000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 10 व्हेंटिलेटर्स, 10,000 एन-95 रेस्पिरेटर्स आणि 2,500 पीपीई किट्स आदी साहित्य देणगीदाखल दिले आहे.