एक हात मदतीचा नव्हे कर्तव्याचा !!

एक हात मदतीचा नव्हे कर्तव्याचा !!

    प्रतिनिधी- प्रीती तिवारी: महाराष्ट्रात ह्या वर्षी पावसाळ्यात झालेल्या भीषण अतिवृष्टी मुळे महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्तिथी निर्माण झाली आहे. अनेक सामाजिक संस्था, अनेक पक्षांचे नेते यांनी पूरग्रस्तांना होईल तितका मदतीचा हात दिला आहे.

     शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे व आमदार तथा पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार, शाखा क्रमांक 198 - माजी महापौर/नगरसेविका सौ. स्नेहल आंबेकर, शाखा प्रमुख श्री. दिपक बागवे, महिला शाखा संघटक श्रीमती प्रतिभा दळवी यांच्या आर्थिक सहकार्याने व विभागातील दुकानदारांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले.  विभागातील दुकानदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. धान्य, पाणी, भांडी, ब्लँकेट्स, कपडे, तसेच रोजच्या गरजेच्या इतर वस्तू जमा झाल्या. सर्व सामान टेम्पोने रवाना करण्यात आले. 

     कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना शाखा क्रमांक १९८ चे उपशाखा प्रमुख रवी पास्टे, विलास कदम, अजित कदम, किशोरी काजोळकर, युवासेना शाखा अधिकारी स्नेहल देशमुख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

     स्नेहल आंबेकर ह्या एक कर्तव्य दक्ष नगरसेविका असून समाज सेविकाही आहेत. बऱ्याच सामाजिक कार्याला त्यांचा मदतीचा हात नेहमीच पुढे असतो. त्यांनी सढळ हस्ते मदत देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे, शिवसैनिकांचे, विभागातील व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

      स्नेहलताई आंबेकराना बातमीकार वृत्तपत्राद्वारे त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week