
ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याचा लोअरपरळ येथील खिमजी नागजी चाळीतील रहिवाश्यांनी केला जाहीर निषेध !
ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याचा लोअरपरळ येथील खिमजी नागजी चाळीतील रहिवाश्यांनी केला जाहीर निषेध !
काल रात्री 24 दिसेम्बर रोजी रात्री 9.55 वाजता सदगुरु मोरे माऊली पुण्यतिथी उत्सवाच्या कार्यक्रमा दरम्यान ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पाचे, किर्तनाची सांगता होत असतानाच पादत्राणे घालून तिथे बसलेल्या वारकऱ्यांना ओलांडुन मंडपात घुसले बेशिस्त भाषेत बोलून साऊंड ऑपरेटरच्या कानफाटात मारली. सर्व कार्यक्रम कायदेशीर नियमानुसार होणाऱ्या ह्या सप्ताहाला गालबोट लागले. ह्या प्रकाराचा खिमजी नागजी चाळीतील रहिवाश्यांनी जाहीर निषेध केला आहे. सदर प्रकाराबाबत माफीची मागणी रहिवाश्यांनी व (वारकरी संप्रदाय) मोरे माऊली संस्थेने केली आहे.
सदर प्रकाराबाबत आमच्या प्रतिनीधींनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे येथे माहितीसाठी विचारणा केली असता पोलीसांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
स्थानिक नगरसेविका सौ. स्नेहल आंबेकर यांनी प्रतिक्रिया नोंदवत घडलेला प्रकार हा निंदनीय आहे, माझी भूमिका राहिवाश्यांच्याच बाजूने राहील असे सांगितले.