
पांडुरंग बुधकर मार्ग व डॉ. ऍनी बेझंट मार्गावरील वाहतुक कोंडी कमी होणार.
पांडुरंग बुधकर मार्ग व डॉ. ऍनी बेझंट मार्गावरील वाहतुक कोंडी कमी होणार.
युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे पांडुरंग बुधकर मार्ग व डॉ. ऍनी बेझंट मार्गावरील वाहतुक कोंडी कमी होणार.
पांडुरंग बुधकर मार्गावरून (सेंचुरी वसाहत शेजारून ओंकार १९७३ बिल्डिंग मार्गे) थेट सेंचुरी बाजारकडे जाणारा मार्ग (शॉर्टकट) विकास आराखडा (DP) मध्ये नमूद असूनही या मार्गावर इमारतींच्या अद्याप सुरु असलेल्या बांधकामामुळे हा मार्ग प्रत्यक्ष वाहतुकीसाठी सुरु करता येत नव्हता.
पांडुरंग बुधकर मार्गावर मोठ्या प्रमाणात होणारी वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी
महानगरपालिका व SRA सोबत केलेल्या यशस्वी मध्यस्तीमुळे लवकरच हा मार्ग दोंन्ही बाजुंच्या वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
या निर्णयामुळे पांडुरंग बुधकर मार्ग व मेट्रो ३ चे काम सुरु असलेल्या डॉ. ऍनी बेझंट मार्गावरील *वाहतुक कोंडी* मोठ्या प्रमाणात कमी होणार असून वेळ व इंधनाचीही बचत होणार आहे.