
वस्तू व सेवाकर भवनातील कंत्राटी कर्मचा-याचे वित्त मंत्र्याना लोकशाही दिनी आपल्या मागण्याचे निवेदन सादर !
वस्तू व सेवाकर भवनातील कंत्राटी कर्मचा-याचे वित्त मंत्र्याना लोकशाही दिनी आपल्या मागण्याचे निवेदन सादर !
अल्प वेतनात वेढबिगार म्हणून गेली १० वर्ष कार्यरत राहिलेल्या, सूशिक्षित तरुणावर बेका-रीची कूराड कोसळली असून, आपले मायबाप सरकार आपले गा-हाणे ऐकून घेऊन आपणास निश्चितच न्याय देतील या आशेपोटी आझाद मैदान येथे दि.२१ व दि.२४ जून,२०१९ रोजी मुक धरणे आंदोलन पार पाडले. आमदार किरण पावसकर यांनी यावेळी सदिच्छा भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तत्कालीन अर्थराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी दि.२४जून,२०१९ ला मागण्याबाबत शिष्टमंडळासोबत लवकरच बैठक घेणार असल्याचे आश्वासन देऊन धरणे आंदोलन संपवले. तत्कालीन अर्थमंत्री सुधीरभाऊ मुंनगटीवार यांची दि.२७/१२/२०१८ रोजी त्याच्या दालनात भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
विधानपरिषदेत दि.०३/०३/२०२० रोजी तारांकित प्रश्न क्रं.१७५ उपस्थित करण्यात आला. तरी प्रश्न माग्री लागला नाही म्हणून आज दि.१८/०२/२०२१ रोजी मा.उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री यांची लोकशाही दिनाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस भवन, बँलार्ड इस्टेट येथे भेट घेऊन आपल्या न्याय हव-कास बाधा न येता न्याय मिळावा म्हणून पून्हा एकदा पर्यायी शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावी. अशी विनंती करण्यात आली. या भेटीच्या वेळी सुकन्या किर, विकी गायकवाड,प्रिती चव्हाण उपस्थित होते.