वरळी डॉ. ऍनी बेसंट रोडवरील भिंतींची रंगरंगोटी !

वरळी डॉ. ऍनी बेसंट रोडवरील भिंतींची रंगरंगोटी !

          जी/दक्षिण महानगरपालिकेच्या माध्यमातून वरळी येथील डॉ. ऍनी बेसंट रोड वरील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) लगतच्या पदपथांवरील भिंतींची रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यात येत आहे.

           अर्णवी आर्ट प्रोजेक्ट ही संस्था सर्वसामान्य समाजापासून अलिप्त असलेल्या तृतीयपंथी लोकांना ही कला शिकवून त्यांच्यात एक नवी उमेद निर्माण करण्याच्या भावनेतून त्यांच्याकडून सदर रंगरंगोटीचे काम करुन घेते. सदर सुशोभिकरणाची पाहणी प्रभाग समिती अध्यक्ष, स्थानिक नगरसेवक श्री. दत्ता नरवणकर यांनी केली व संस्थेच्या कामाची प्रशंसा केली.

       सदर प्रशंसनीय काम करुन घेणाऱ्या मा. सहाय्यक आयुक्त श्री. शरदजी उघाडे आणि त्यांच्या सर्व सहकारी अधिकारी वर्गाचे आभार प्रभाग समिती अध्यक्ष, स्थानिक नगरसेवक श्री. दत्ता नरवणकर यांनी मानले आहेत !


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week