
दि. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्ताने लोअरपरळ शिवसेना शाखा क्र. १९५ (माधव भुवन) च्या वतीने कार्यक्रम !
दि. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्ताने लोअरपरळ शिवसेना शाखा क्र. १९५ (माधव भुवन) च्या वतीने कार्यक्रम !
दि. २३ जानेवारी रोजी सालाबाद प्रमाणे हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्ताने लोअरपरळ शिवसेना शाखा क्र. १९५ (माधव भुवन) च्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
माधव भूवन परिसरातील जेष्ठ नागरिकांना टॉवेल वाटप करून सत्कार करण्यात आले व लहान मुलांसाठी टिफिन बॉक्स चे वाटप करण्यात आले, त्यावेळी लोअरपरेल विभागातील जेष्ठ शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.
अशा ह्या कार्यक्रमाचे सलग हे पाचवे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम मी व माझे सर्व सहकारी मोठ्या उत्साहात करतो, असे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक उपशाखाप्रमुख प्रकाश जळगावकर यांनी सांगितले.