२६ जानेवारीच्या पर्वावर पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा वसई,विरार याजकडून ३२ वे रास्ता सुरक्षा जन जागृती अभियानाचे आयोजन !!

२६ जानेवारीच्या पर्वावर पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा वसई,विरार याजकडून ३२ वे रास्ता सुरक्षा जन जागृती अभियानाचे आयोजन !!

   दि. २४ जानेवारी, २६ जानेवारीच्या शुभ पर्वावर वसई विरार पोलीस आयुक्तालय वाहतुक शाखा यांचे ३२ वे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान दि. १७/१/२०२१ ते १८/२/२०२१ पर्यंत राबविण्यात येत आहे. जनजागृती अभियानासाठी जागो जागी माहितीचे बॅंनर लावण्यात आले आहेत. "सडक सुरक्षा जीवन रक्षा" या अभियानात प्रामुख्याने सुरक्षित वाहन कसे चालवावे याची माहिती देण्यात येत आहे. 

    प्रामुख्याने विध्यार्थ्यांसाठी-

फुटपाथ वरून चालावे, रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. आपल्या उंचीस योग्य सायकलचा वापर करावा, घोळक्याने सायकल चालवू नये, दोन्ही हात हँडलवर ठेवा, रस्ता क्रॉस करताना पळू नये, शाळा भरताना व सुटताना गेटवर गर्दी करू नये, बस मधून येत जात असाल तर पुढच्या दाराने उतरा व चढा, परंतु चालत्या बसमध्ये चढू वा उतरू नका, असे नमूद करण्यात आले आहे.

तसेच काही महत्त्वाच्या सूचना पुढील प्रमाणे दिल्या आहेत.

वाहनचा वेग मर्यादित ठेवा, वाहन चालवताना मोबाइल वर बोलू नका, दर सहा महिन्यांनी वाहनांची पी.यु.सी. करा अन्यथा १०००/-रु. दंड होऊ शकतो. वाहनाना बे कायदेशीर गॅस किट बसवू नका, ओव्हर टेक करताना पुढच्या वाहनाचा अंदाज घेतल्या शिवाय ओव्हर टेक करू नका, विचारात गर्क असताना रस्ता ओलांडू नका. अशी माहीती पत्रकात दिली आहे.

     सुरक्षात्मक ड्रायव्हिंग म्हणजे अशा प्रकारे वाहन चालविणे की ज्या मूळे अचानक बिकट परिस्थिती उदभवली किंवा इतरांनी चूक केली तरी अपघात होणार नाहीत. ही काळजी घ्यावी, असे पत्रकात म्हटले आहे. तसेच २६ जानेवारी २०२१ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. असे वसईचे सहा.पो.उपनिरीक्षक श्री. रवी परब यांनी माहिती देताना सांगितले..


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी