
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या जन्मदिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात !
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या जन्मदिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात !
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या जयंती निमित्त लोअर परळ विभागातील दिवंगत वृत्तपत्र विक्रेते सुधाकर पवार यांच्या पत्नीला रोजगाराची संधी मिळावी, स्वतःचा उद्योग करून कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे हाकता यावा, या उद्देशाने नगरसेवक आशिष चेंबुरकर व शिवसेना शाखा क्र १९८ चे शाखाप्रमुख दिपक बागवे यांच्या तर्फे पवार कुंटुंबाला (पीठ दळण्यासाठी) घरघंटी देण्यात आली. यावेळी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे श्री.बाळा पवार, हेमंत मोरे, भालचंद्र पाटे, अजित सहस्त्रबुद्धे, प्रवीण पवार व गणेश खेनट हे उपस्थितीत होते. पवार कुंटुबाला मोलाचे सहकार्य केले याबद्दल बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेते संघाच्यावतीने जीवन भोसले यांनी शाखाप्रमुख दिपक बागवे यांचे आभार व्यक्त केले.