
ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक विजय ना कदम यांचा सत्कार !
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त, दादर सार्वजनिक वाचनालय, काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई यांच्या सहकार्याने बुधवार दि २०/१/२०२१ रोजी, जागतिक तुलनेत मराठी साहित्य या विषयावर जागतिक कीर्तीचे श्री. शशिकांत सावंत ग्रंथ सखा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघाने आयोजित केलेल्या करोना या महामारीची कठीण परिस्तिथी उद्भवली असताना, वृत्तपत्र लेखक या नात्याने इति कर्तव्य म्हणून, करोना काळात वृत्तपत्रात महत्वाचे लेखन केल्याबद्दल शशिकांत सावंत यांच्या हस्ते ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक विजय ना कदम यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात रवींद्र मालुसरे, अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मा अध्यक्ष मनोहर साळवी, दासावा च्या कार्यवाह शोभा कामथे, राजन भालींगे, हेमंत सामंत, अरुण खटावकर, श्रीनिवास डोंगरे, राजन देसाई, प्रशांत भाटकर इ पदाधिकारी उपस्थित होते.