
नगरसेविका सौ. स्नेहल सूर्यकांत आंबेकर यांच्या वतीने कुष्ठरोगी रूग्णांना फळे, सॅनेटायझर, कापडी मास्क वाटप !
नगरसेविका सौ. स्नेहल सूर्यकांत आंबेकर यांच्या वतीने कुष्ठरोगी रूग्णांना फळे, सॅनेटायझर, कापडी मास्क वाटप !
शिवसेना शाखा क्र.१९८ च्या वतीने २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मा. महापौर नगरसेविका सौ. स्नेहल सूर्यकांत आंबेकर यांच्या वतीने अक्वर्थ हॉस्पिटल महानगरपालिका कुष्ठरोग (acworth leprosy museum) येथील रूग्णांना फळे, सॅनेटायझर, कापडी मास्क वाटप करण्यात आले. त्यावेळी सौ. आंबेकर यांनी रुग्णांची आवर्जून चौकशी केली व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी शाखाप्रमुख श्री. दिपक बागवे, म.शाखा संघटक श्रीमती. प्रतिभा दळवी, युवासेना उपसचिव श्री. संदीप वरखडे, म.शाखा समन्वयक सौ. उज्ज्वला मोरवणकर, युवासेना शाखा अधिकारी श्री.नितीन शिरोडकर, युवासेना युवती अधिकारी कु.योगिनी सावंत व सर्व महिला उपशाखा संघटक व पदाधिकारी उपस्थित होते.