
दक्षिण मुंबईत शिवसंग्रामचा कार्यकर्ता मेळावा संपन्न !
शनिवार दिनांक २ जानेवारी २०२१ रोजी दक्षिण मुंबई जिल्ह्याच्या वतीने शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीलाच शिवसंग्रामचे मुंबई उपाध्यक्ष दिवांगत हरिश्चंद्र (बाळू) राणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या मेळाव्यास आवर्जून उपस्थित असलेले शिवसंग्राम प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी आंब्रे यांनी संबोधित केले. यावेळी महाराष्ट्र चिटणीस व मुंबई प्रभारी सत्यवान (भाई) राऊत, या मेळाव्यास मुंबई चिटणीस हिंदुराव जाधव, मुंबई युवक आघाडी सुनील खाडे, जिल्हाध्यक्ष योगेश विचारे, बालाजी (बबन) जाधव, आकाश जाधव, त. अध्यक्ष श्रीराम शिंदे, त. अध्यक्ष सतीश सुर्वे अध्यक्ष उत्तर मुंबई गणेश घोसाळकर त.अध्यक्ष मोरे उपस्थित होते.
या मेळाव्यास शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायकराव मेटे यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मेटे यांच्या हस्ते जिल्हा पदाधिकारी म्हणून श्री. अनिल बेलसेकर, साईनाथ मोरे यांच्या निवडीचे पत्र देऊन व ता. अध्यक्ष जितेंद्र नर यांच्या निवडीचे पत्र देऊन तसेच वरळी महिला तालुका अध्यक्ष म्हणून सुनिता कोंडेकर, तसेच ता. उपाध्यक्ष म्हणून श्री. नितीन मोहिते व चिटणीस म्हणून श्री. सुधीर गिरकर यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास महिला आघाडी तील प्राची कदम, शितल चव्हाण, शामल पवार व हरिश्चंद्र (बाळू) राणे यांची कन्या ऐश्वर्या हरिश्चंद्र राणे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे विशेष आयोजन दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. पुंडलिक राजाराम मालुसरे यांनी केले होते.