स्वामीशिर्वाद ग्रंथ २०२१ प्रकाशन सोहळा संपन्न !

स्वामीशिर्वाद ग्रंथ २०२१ प्रकाशन सोहळा संपन्न !

          श्री. स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने जे स्वामींनी भक्तांना शिकविले तेच स्वामींनी   लिहायला सांगितले. श्री नाथस्वामींनी ग्रंथ रूपाने ते स्वामी भक्तांकरवी करून घेतले.

        श्री. नाथस्वामी यांच्या संकल्पनेने व प्रेरणेने, "स्वामीशिर्वाद ग्रंथ २०२१" चा  प्रकाशन सोहळा, नवीन वर्षाच्या प्रथम दिवशी, आर्थर रोड  नाका येथील, श्री स्वामी समर्थ कट्टा मठात, अध्यक्ष - बाळ पंडित यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. 

         तदप्रसंगी, स्वामी समर्थ कट्टा परिवाराचे सचिव- राजेंद्र चव्हाण सह रवींद्र रेवडेकर व सागर मेस्त्री उपस्थित होते.

      असाच प्रकाशन सोहळा एकाच वेळी, नाथस्वामी यांच्या आदेशानुसार गणेश मंदिर फिनले मिल (लालबाग), श्री. दत्त मंदिर (डिलाईल रोड), परेल सेंट्रल रेल्वे मठ, विलेपार्ले मठ, कांदेवाडी मठ (गिरगाव), दादर मठ, चेंबूर मठ, कांदिवली चारकोप मठ, कृष्णनगर बोरिवली (पूर्व)मठ येथेही संपन्न झाला. 

          स्वामी कट्टा मठात यावेळी नाथस्वामी भक्त परिवारातील श्रीमती सखुबाई शिंदे, विजय शिंदे, रेखा शिंदे, किसन चव्हाण, विजय चव्हाण, वैष्णवी चव्हाण, नागेश गाजेंगी, शांता कुमार, प्रभाकर वैद्य, अनिल शिंदे, दुर्गादेवी यादव, सावरी घाडीगांवकर, सुर्यकांत कदम, तृषा जामसूदकर व रोहित यादव आदींनी स्वामीशिर्वाद ग्रंथ, शाल-श्रीफळ व प्रसाद स्वामी समर्थाना अर्पण करून आशिर्वाद घेतले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे