
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिला हमाल बांधवांना आधार !
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिला हमाल बांधवांना आधार !
कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद असल्या कारणाने हमाल वर्गास अनेक समस्यांचा सामना करावा लागला. हमाल म्हणजे काही रेल्वे कर्मचारी नाहीत, त्यामुळे त्यांना पगार देखील नाही.
शिवसेना दक्षिण मुंबई खासदार अरविंद सावंत यांनी या दुर्लक्षित घटकाकडे विशेष लक्ष देऊन वाढदिवसाचे औचित्य साधत आज मुंबई सेंट्रल परिसरातील मुंबई सेंट्रल पोर्टल्स म्हणजेच हमाल यांना अन्नधान्य वाटप केले.
यावेळी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, महिला विभाग संघटिका जयश्री बळ्ळीकर, उपविभाग प्रमुख राम साळगावकर, राजु फोडकर, सुजीत राणे, माजी नगरसेवक अरुण दुधवडकर, शाखाप्रमुख राजेश आवळेगावकर, सिद्धेश माणगावकर, एम टी एन एल कामगार संघ पदाधिकारी दिलीप जाधव, दिलीप (बाळा) साटम, मारुती साळुंखे, रवी सुर्वे इ. उपस्थित होते. येत्या दोन दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर इ. रेल्वेस्थानकास भेट देऊन तेथील हमालांना देखील अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे.