
विकासक लोखंडवाला बिल्डर्स यांनी बांधलेल्या वरळी, प्रभाग क्र. १९८ येथील इमारतींची अवस्था बिकट !
विकासक लोखंडवाला बिल्डर्स यांनी बांधलेल्या वरळी, प्रभाग क्र. १९८ येथील इमारतींची अवस्था बिकट !
१९९९ ला SRA योजनेअंतर्गत विकासक लोखंडवाला बिल्डर्स यांनी बांधलेल्या वरळी, प्रभाग क्र. १९८ मधील लेडी रतन कॉम्प्लेक्स, दैनिक शिवनेर मार्ग येथील १५ इमारतींची अवस्था बिकट झालेली आढळली आहे. नुकतेच इमारत क्र. ११ ब (महालक्ष्मी दर्शन) रूम नं. २०४ मधील छत कोसळले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
माजी आमदार श्री. सुनिल शिंदे, शाखाप्रमुख श्री. दीपक बागवे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली व खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून डागडुजी करण्याचे तसेच संपूर्ण १५ इमारतींच्या धोकादायक अवस्थेबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासन व स्थानिक सोसायटी यांची लवकरात लवकर एक बैठक आयोजित करू असे आश्वासन शिंदे यांनी दिले.