
कामगार नेते निशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला चाहत्यांची हजेरी !
कामगार नेते निशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला चाहत्यांची हजेरी !
भगवे आमुचे रक्त तळपती, तप्त हिंदवी बाणा या वाक्याला खरे उतरलेले, मुंबईतील लोकप्रिय माजी आमदार सुनील शिंदे यांचे छोटे बंधू व कामगार क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारे युवा नेतृत्व, समाजसेवक निशिकांत शिंदे यांचा वाढदिवस नुकताच लोअर परेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडीकांचे विश्वासू मानले जाणाऱ्या शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी कामगार वर्गातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. तसेच विभागातील अनेक मंडळांनी, तरुणांनी आणि विविध सामाजिक संस्थांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लोअरपरळ परिसरात मोठया प्रमाणात युवकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक जागोजागी लावलेले होते.
युवकांना नोकऱ्यांची, रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने झटणारे शिंदे यांचे विभागात मोठे स्थान आहे, कोविड मूळे मी यावेळी वाढदिवस साजरा करणार नाही असे आवाहन केलेलं असताना देखील शिंदे यांच्या चाहत्यांना थांबविणे शक्य झाले नाही, लोकांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने, आनंदाने त्यांना वाढदिवसानिमित्ताने भेटून शुभेच्छा दिल्या.
आम्ही नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतो. करोनाच्या काळात देखील आम्ही विविध सामाजिक कार्य हाती घेतले असून गरजू नागरिकांना अन्नधान्य आणि मोफत औषधे पुरविण्यात मदत केली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी राज्यात रक्ताचा तुटवडा आहे असे आव्हान केल्यानंतर आम्ही लवकरच विभागात अनेक रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करणार आहे. या शिबिरामध्ये तरुणांनी, युवतींनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन कामगार नेते, समाजसेवक निशीकांत शिंदे यांनी केले आहे.
आम्ही निशिकांत शिंदे यांना अनेक वर्षांपासून ओळखत असून त्यांचे सामाजिक कार्य फार मोठे आहे. तरुणांना नोकरी देण्यापासून ते उद्योजक बनवण्यापर्यंत ते नेहमी सहकार्य करत असतात. ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून लवकरच ते विभागात ठिकाणी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आयोजित करणार आहेत. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, समाजसेवक गणेश आडीवरेकर यांनी दिली.