
विरोधाला विरोध नको !!
मेट्रोच्या कारशेडच्या जागेच्या मालकीचा नको तो वाद निर्माण करून केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये झारीतील शुक्राचार्य बनू पाहत आहेत, विरोध करीत आहेत. महसूल विभागाच्या नोंदणीनुसार ही राखीव जागा राज्य सरकारची आहे. यावर न्यायालयीन निर्णय झाला आहे. तत्कालीन महसूल मंत्री यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता तीन वर्षांनीं केंद्राला जाग आली आहे. तरी मुंबई, महाराष्ट्रच्या विकासापेक्षा शुद्र राजकारणासाठी, विरोधी पक्ष नेते मंडळी आपल्याच राज्याच्या विकासापेक्षा सत्तारूढ पक्षाला विरोधाला विरोध करणे, मुख्यमंत्री बदलला की मालकी बदलते का ? तरी विरोधाला विरोध करणे हेच भाजप चे राजकीय कार्य आहे का ?