हिंदू सणांसाठी मराठी जनांसाठी फक्त मनसे !!

हिंदू सणांसाठी मराठी जनांसाठी फक्त मनसे !!

        लोअरपरळ मधील आदित्य सेवा मंडळ, मोतिराम दयाराम चाळ इथे अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो सध्या सदर चाळ ही पुनर्विकास प्रक्रियेत आहे अश्या परिस्थिती मध्ये विकासक त्या जागेत उत्सव साजरा होऊ नये म्हणून प्रयत्नांत होता म्हणजेच त्याचा उत्सव करण्यास विरोध होता असे स्थानिकांना समझले त्यांनी त्यासाठी परवानगी सुद्धा मागितली परंतु टाळाटाळ झाली.

        

         सदर बाबीची तक्रार स्थानिक रहिवाशी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोअर परळ प्रभाग 198 येथील शाखा अध्यक्ष अमोल देसाई यांच्याकडे केली त्यानंतर त्यांनी लागलीच विकासकाला धारेवर धरून उत्सव साजरा करायला देण्यास भाग पाडले तेव्हा उपविभाग अध्यक्ष दत्ता पाटील व उपशाखा अध्यक्ष - सुहास नर, दिनेश निकम, शैलेश अहिर, निरंजन पाटील, समीर गोवळकर  उपवॉर्ड अध्यक्ष - अवधूत घाडीगावकर, संकेत आव्हाड व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. 

        आदित्य सेवा मंडळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week