
राज्यपालांचा हव्यास !!
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी मंदिर उघडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रामध्ये हिंदुत्वाबद्दल लिहिलेले खरोखरच निःपक्षपाती असणाऱ्या राज्यपालांची कृती अशोभनीय आहे. महाघाडीचे सरकार असून सत्तारूढ झाल्यापासून विरोधी पक्ष भाजपा, कोणत्या ना कोणत्या कारणांनी विरोध करत असून, करोना महामारीचे दिवस असून ही विरोधाला विरोध करण्याचे भाजपचे कार्यक्रम आहे. मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिताना धर्मनिरपेक्ष असे कुत्सितपणे संभोधणे हे कोणत्या शब्द संस्कृती मध्ये शोभते. "सेक्युलर" ह्या शब्दाचा दुःवास का ?
भगतसिंग कोशियारी हे गोव्याचे पण राज्यपाल आहेत. परंतु ते गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्रं का लिहीत नाहीत. मुंबईतील लोकल प्रवासासाठी फेऱ्या वाढवण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत. करोना महामारीचे संकट अजून ही संपलेले नाही. नुसते मंदिर उघडण्यासाठी (राज्यपालांचा सन्मान ठेऊन) राज्यपालांना हव्यास कशाला? हे सुज्ञ जनतेला कळू शकते.