१०० रुपयांचे नाणे विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने जारी !!

१०० रुपयांचे नाणे विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने जारी !!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका व्हर्चुअल कार्यक्रमादरम्यान विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने १०० रुपयांचे नाणे जारी केले आहे. कोरोनामुळे नाणे अनावरणचा कार्यक्रम व्हर्चुअल पद्धतीने पार पडला. यावेळी सिंधिया कुटुंबासह इतर मान्यवरांनी सहभाग घेतला होता.

        विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने १०० रुपयांचे नाणे जारी केलेले आहे, विजया राजे यांना ग्वाल्हेरच्या राजमाता म्हणून ओळखले जाते. ग्वाल्हेरचे अंतिम महाराजा जीवाजीराव यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या सन्मानार्थ जारी केलेले १०० रुपयांचे हे नाणे चार धातूपासून तयार करण्यात आले असून या नाण्याचे वजन ३५ ग्राम आहे. तसेच या नाण्यामध्ये ५० टक्के चांदीचा वापर करण्यात आला असून इतर धांतूचे प्रमाण ५० टक्के आहे.विजया राजे या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या माता आहेत. विजयाराजे सिंधिया यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९१९ ला झाला होता. तर २५ जानेवरी २००१ ला नवी दिल्लीत त्यांचे निधन झाले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week