
वरळी पोलीस कॅम्प येथील पोलीस कुटुंबियांना दिलासा !
पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वरळी पोलीस वसाहतीमधील ९ इमारतींची पुनर्बांधणी व ६० इमारतींचे दुरुस्ती व नुतनीकरण यासंदर्भात बैठक पार पडली. या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी शासनास प्रस्ताव बनवून सादर करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उचललेल्या या सकारात्मक पावलामुळे पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, माजी आमदार सुनिल शिंदे, उपनेते सचिन अहिर, विभगप्रमुख नगरसेवक आशिष चेंबुरकर व सबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचे पोलिस कुटुंबियांच्या वतीने जाहिर आभार मानण्यात आले.