ठाकरे कधी होणार कठोर !!
करोना साथीला संपूर्ण सरकारी यंत्रणा सामना करून साथ नियंत्रणात आणण्याकरीता प्रयत्न करताना दिसत आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातल्या यंत्रणेने करोना वर चांगला ताबा मिळवला आहे. त्यात समाधान न मानता आता तिसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर झाला असून, तरी ही करोना प्रसार वाढतातच आहे. महाराष्ट्रात आणि विशेषता मुंबई पुण्यामधे ३०% करोना ग्रस्तांची वाढ झालेली आहे. तरी करोना बरे होण्याची संख्या ही वाढत आहे. यात नियंत्रित ठेवण्यात यशस्वी झालेले संयमी, संवेदनशील मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांची कार्यशैली पाहून अनेक शेत्रात वाह वाह होत आहे. करोना वर सरकारचे नियंत्रण पाहता काही नतद्रष्ट हितशत्रू सरकारला साथ देण्याऐवजी सरकारला संकटात टाकण्याच्या हिरीरीने प्रयत्न करीत आहेत. बांद्रा रेल्वे स्टेशन, पालघर साधूंचे मृत्यू प्रकरण इत्यादी प्रकरणाचा नको तो बाऊ करून सरकार वर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावेळी जनतेशी संवाद करतांना शेवटी अनिष्ट गोष्ट खपवून घेणार नाही, कठोर कारवाई करू असे संवाद मुख्यमंत्री साधत आहेत.
पण त्यांच्या स्वभाव नुसार ते कठोर पावले उचलणार नाहीत ह्याची हित शत्रूंना कल्पना असावी म्हणुन त्याचा दुरुपयोग केला जात आहे असे लक्षात येते. महसूल साठी दारूबंदी शिथिल केल्यावर दारु घेण्यासाठी गोंधळ झाला. सोशल डिस्टसिंग अमलात न आणणारे, डॉक्टर, पोलिसांवर हल्ले होत असताना देखील मुख्यमंत्री तुम्ही खबरदारी घ्या, मी जवाबदारी घेतो असे हाथ जोडून सांगत आहेत. त्यांनी ३१ मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र ग्रीन झोन करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं आहे. ते पूर्णत्वास येण्याकरीता लॉक डाऊन, शासकीय नियमांची अंमलबजावणी कठोरपणे करावी. तरच करोना वर विजय प्राप्त होऊ शकेल. त्याकरिता मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्णय घेण्यास हवे.