
रोगा पेक्षा इलाज महाग !!
मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्याला महसूल मिळण्याकरिता वाइन शॉप उघडण्यात यावी, त्याच बरोबर इतरही काही मागण्या लॉकडाऊन चे नियम पाळून केल्या आहेत. तरी ज्या लोकांना लॉकडाऊन काळात खरोखर मद्य मिळाले नाही म्हणून महसूलच्या नावाखाली एवढ्या कळवळा कशाला? इतरही उपाय योजनेतून महसूल मिळू शकतो. तरी लॉक डाऊन मुळे एकत्र कुटुंब एकाच घरत रहात असताना मुलांसमोर, आई वडलांसामोर, मद्यपान करायचे का? त्यामुळे घरोघरी वाद विवाद, भांडणे होणार नाहीत का? शासन यंत्रणेला, पोलिस रस्त्यावरील मद्यपी संबंधी कोणते धोरण आखणार आहेत? म्हणजेच रोगा पेक्षा इलाज महाग पडणार नाही का?