
मा. आमदार सुनील शिंदे यांची डॉक्टरांना विनंती !
करोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे लोअर परळ, वरळी, डिलाईल रोड परिसरातील अनेक डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने मागील २/३ दिवसांपासून बंद ठेवल्याच्या तक्रारी मला येत आहेत. यामुळे सामान्य आजारांवर उपचार घेताना अनेक रुग्णांचे खूप हाल होत आहेत. वैद्यकीय क्षेत्र हे अत्यावश्यक सेवा असून संचार बंदीतून त्यांना वगळण्यात आले आहे.
विभागातील सर्व डॉक्टर्सना मी विनंती करतो की मागील अनेक वर्षे आपण आपल्या विभागात दवाखाने (क्लिनिक) चालवत लोकांची सेवा केलात तशीच या आपत्ती काळात ही रुग्ण सेवा सुरु ठेवावी व जनतेला सहकार्य करावे.
विभागातील अनेक डॉक्टर्सना मोबाईलवरून संपर्क करून दवाखाने सुरु ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तरीही दवाखाने सुरु ठेवण्यास डॉक्टर्सना काही अडचण होत असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. तसेच दवाखाने बंद असलेल्या डॉक्टर्सचे मोबाईल क्र. नागरिकांनी मला कळवावे.
असे शिंदे यांनी सांगितले आहे.