
महालक्ष्मी रेल्वे स्टेशन समोरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.
महालक्ष्मी रेल्वे स्टेशन समोरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.
युवासेनाप्रमुख, आमदार मा. आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केशवराव खाडे मार्ग ते डॉ. ई. मोझेस रोड (महालक्ष्मी रेल्वे स्टेशन समोरील ब्रिज) येथे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या ब्रिजचे रुंदीकरण करण्याबाबत माजी आमदार श्री. सुनिलजी शिंदे यांचा पाठपुरावा सुरु आहे. आज सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे जी यांच्यासह या संदर्भात त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या ब्रिजच्या दोन्ही बाजूला खूप मोठ्या रुंदीचे फुटपाथ असून रहदारीसाठी याचा अत्यंत कमी प्रमाणात वापर होतो. या दोन्ही फुटपाथची रुंदी कमी केल्यास रस्त्याची रुंदी वाढेल व दोन्ही बाजुंनी वाहनांसाठी एक अतिरिक्त मार्गिका उपलब्ध होईल व यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे जी यांनीही या प्रस्तावावर कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.