
वरळीतील अभ्यास गल्लीला सुविधा मिळाल्या !
वरळी मधील पोद्दार व कामगार रुग्णालयाच्या मधील ऐतिहासिक अभ्यासगल्ली या गल्ली मध्ये शिकून अनेक विद्यार्थी वकील, डॉक्टर, पत्रकार तसेच पोलीस अधिकारी शासनाच्या विविध उच्च पदावर कार्यरत आहेत फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत विविध शाळा व महाविद्यालय यांच्या परीक्षा सुरु होतात त्या कालावधीत या अभ्यास गल्लीत अनेक मुले अभ्यास करण्यासाठी येतात पण या गल्लीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती, युवासेनेच्या अभिजित पाटील यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मुलांना रात्री अभ्यास करण्यासाठी उच्च दाबाचे नवीन एलेडी दिवे बेस्ट प्रशासनाकडून लावून देण्यात आले व महापालिकेकडून गल्लीमध्ये गतिरोधक टाकून सुशोभीकरण करण्यात आले तसेच नो पार्किंगचे फलक आणि विद्यार्थ्यांसाठी फिरते शौचालय उपलब्ध करून दिले. युवासेनाप्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार या कामासाठी नगरसेवक आशिष चेंबूरकर माजी आमदार सुनील शिंदे सहाय्यक आयुक्त शरद उघडे सहाय्यक अभियंता रवी म्हस्के सहाय्यक अभियंता नानोटे बेस्टचे अधिकारी दातार व राणे या सर्वांचे सहकार्य लाभले असे अभिजित पाटील यांनी सांगितले.