वरळीतील गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरीची दुरावस्था !

वरळीतील गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरीची दुरावस्था !

    वरळी सी फेस जवळील गंगा अ ब, यमुना, गोदावरी या शासकीय इमारती वाईट स्थितीत असल्याचे निदर्शनात आले आहे, या सर्व इमारतींना तडे गेलेले आहेत, सदर इमारतीत क्लास १, क्लास २ दर्जाचे अधिकारी राहतात, यातील एका इमारतीच्या कॉलमचा काही भाग यापूर्वी कोसळला होता पण सुदैवाने कोणतीच जीवित हानी झाली नाही, त्यामुळे देखभाली अभावी अतिशय जीर्ण झालेल्या या इमारतीत रहिवाश्याना आपला जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. 

      इमारतींच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दुरुस्तीसाठी निधी देण्यात यावा अशी मागणी स्थानिक रहिवाश्यांनी व युवा सेनेच्या वतीने अभिजीत पाटील यांनी केली आहे. अतिशय वाईट अवस्थेत असलेल्या या इमारतीत जर काही दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार शासन व संबंधित विभागाचे शासकीय अधिकारीच राहतील असे पाटील यांनी सांगितले.

         माजी आमदार सुनील शिंदे यांनी नुकतीच इमारतींची पाहणी देखील केली, इमारत दुरुस्तीसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात विषय मांडला होता अनेक बैठका देखील झालेल्या होत्या, त्याबाबत बराच पाठपुरावा केलेला होता व विशेष प्रयत्न करून त्यावेळी १२ कोटींचा निधी देखील मंजूर होऊन आलेला होता व आता पुढील दुरुस्तीसाठी प्रयत्न चालू असल्याचे समजते.  

        माजी आमदार सचिन अहिर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीसाठी मी तरतूद करवून देत होतो, पण गेल्या ४ ते ५ वर्षांपासून शासनाने ती तरतूदच बंद करून टाकलेली आहे, आणि त्याठिकाणी नवीन हेड सुरु करणे हा एक महत्वाचा भाग राहील, योगायोगाने ह्या विभागाचे नेतृत्व आदित्यजी करत असल्यामुळे आम्ही रहिवाश्याना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, आणि कोणताही अपघात होऊ नये म्हणून तातडीच्या दुरुस्तीबाबत कोणतीही  तक्रार जर आली तर तात्पुरत्या स्वरूपात तरी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला दुरुस्तीबाबतच्या सूचना देऊ असे सांगितले.     


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week