लालबागच्या खामकर मसाल्याच्या दुकानात 13 लाखाची चोरी !!

लालबागच्या खामकर मसाल्याच्या दुकानात 13 लाखाची चोरी !!

    १३ लाख ८६ हजार २०० रुपये मुददेमाल चोरी करणा-या नोकरास ४८ तासाच्या आत उत्तर प्रदेश येथून अटक.

        दिनांक १६/०४/२०२६ रोजी ००.०१ ते ०७.०० वा. दरम्यान फिर्यादी यांनी त्यांचे मसाल्याचे दुकानातील धंदयाचे मागील आठ दिवसाचे जमा झालेले एकूण रोख रक्कम १३ लाख ८६ हजार २०० रुपये, ही त्यांच्या खामकर मसाला या दुकानाच्या गल्ल्यांमध्ये ठेवली होते. दुसऱ्या दिवशी फिर्यादी हे येऊन दुकानातील रोख रक्कम १३ लाख ८६ हजार २०० रुपये एक गल्ल्यात आहेत का पाहिले असता, ते मिळून आले नाहीत. म्हणून काळाचौकी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक १३९/२६ कलम ३०६ BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

           तपास पथकाने फिर्यादी यांच्या मसाला दुकानात काम करणा-या कामगारांकडे चौकशी केली असता एक कामगार हा सकाळपासून कामावर आला नव्हता. तो उत्तर प्रदेश येथे पळून गेला होता. सदर कामगारा विषयी माहिती घेतली असता, सदर कामगार हा उत्तर प्रदेश मधील गोंडा या जिल्ह्यात राहत असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून सदर कामगारास आयोध्या येथे उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेऊन सदर गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, त्याचे नाव अजय कुमार श्याम सुंदर रावत, वय वर्ष २८, जिल्हा गोंडा, उत्तर प्रदेश असे असून त्याचा गुन्ह्यामध्ये सहभाग आढळून आल्याने दोन पंचा समक्ष ई साक्ष पंचनामा करून अंग जडती घेतले असता त्याच्या ताब्यात १०लाख ४७ हजार ५२० रुपये रोख मिळून आली. ती सीलबंद करून पुढील तपासकामी अटक करण्यात आले आहे.



      सदरची कामगिरी ही मुंबई विभागाचे श्री देवेन भारती, मा. पोलीस आयुक्त, श्री सत्यनारायण चौधरी, मा. पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था, श्री विक्रम देशमाने, मा. अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, श्रीमती रागसुधा आर. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०४, श्री घनश्याम पलंगे, सहायक पोलीस आयुक्त, भोईवाडा विभाग, श्री विजयकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळाचौकी पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सपोनि हसन मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक शीतल माने, पोलीस हवालदार अमर चन्ने, पोलीस शिपाई प्रशांत पवार, महिला पोलीस शिपाई तेजस्विनी गवारी, पोलीस शिपाई चंद्रकांत कुंभार, संकेत नायकवाडी, पोलीस हवालदार गोविंद ठोके (तांत्रिक मदत) यांनी केली आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week