मुंबई पोलिसांनी केले तक्रार निवारण दिनाचे आयोजन !!

मुंबई पोलिसांनी केले तक्रार निवारण दिनाचे आयोजन !!

       मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आदेशान्वये व मा. पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था, मुंबई यांच्या देखरेखीखाली बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते.

         दिनांक १८/०४/२०२६ रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला व जेष्ठ नागरीक यांच्याकरीता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

        सदर आयोजित तक्रार निवारण दिनाच्यावेळी पोलीस ठाण्यात दाखल दखलपात्र व अदखलपात्र गुन्हयातील फिर्यादी तसेच तक्रार अर्जामधील अर्जदार असे एकुण ९७० तक्रारदार हजर होते. त्यापैकी ३५२ महिला तक्रारदार व १५३ जेष्ठ नागरीक हजर होते. पोलीस गण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यात आले.

       या उपक्रमास मुंबई भरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे