सामाजिक कार्यकर्ते बाळ पंडित यांना कोकणरत्न पदवी व पुरस्कार सन्मानीत !!

सामाजिक कार्यकर्ते बाळ पंडित यांना कोकणरत्न पदवी व पुरस्कार सन्मानीत !!

सामाजिक कार्यकर्ते बाळ पंडित यांना कोकणरत्न पदवी व पुरस्कार सन्मानीत.

     मुंबई : चिंचपोकळी येथील, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्र लेखक, विजय उर्फ बाळ पंडित यांना स्वातंत्र्य कोकण राज्य अभियान, मुंबई यांच्या तर्फे सामाजिक व पत्रकारितेतील उत्कृष्ठ योगदाना बद्दल त्यांना  कोकण रत्न पदवी २०२५ पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले. 

          पुरस्कार सोहळा, दि १३ डिसें २०२५ रोजी सायं. ४ वा, मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. स्वतंत्र्य कोकण राज्य अभियान तर्फे,  मुंबई पासून सिंधुदुर्ग पर्यंत कोकणातील उल्लंखनीय समाजिक कार्यकरणा-या व्यक्तींना, मानपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले.  या सोहळ्याला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले होते.

         बाळ पंडित हे विविध सामाजिक संस्थेशी निगडित असून ते पत्रलेखक व पत्रकार आहेत. या पूर्वी त्यांना अखिल भारतीय दलित साहित्य अकॅडमी, दिल्ली, टाटा मेमोरियल  सेंटर, मराठी वृतपत्र लेखक संघ, महाराष्ट्र टाइम्स सिटीझन रिपोर्टर, कोल्हापूर साहित्य रत्न पुरस्कार, महापौर पुरस्कार व अन्य सामाजिक संस्थेने विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे.

          यांनी अनेक कथा, नाट्य लेखन, एकांकिका, वृतपत्रे व वृत्त लेखन केले असून त्याची दखल अनेक वृत्तपत्रांनी घेतली आहे. त्यांचे ह्या सामाजिक कार्याचे योगदान म्हणून त्यांना मानाचा कोकण रत्न  पदविका पुरस्काराने गौरवण्यात आले.

         प्रमुख अतिथी व पत्रकार - सचिन कळझुनकर यांच्या हस्ते सर्वांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

       सोहळ्याचे आयोजन - संस्थापक अध्यक्ष - संजय कोकरे, मुंबई अध्यक्ष - धनंजय कुवेसकर, कोषाध्यक्ष - राजेंद्र सुर्वे, सल्लागार - दिलीप लाड, बापू परब, अजित गोरुले, युवा नेते सचिन गावंडे, निहार संजय कोकरे, अनिकेत चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन तेजस्विनी मुंडये यांनी केले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे