सिनेमा दिग्दर्शकाच्या घरावर बंदुकीने गोळीबार करणाऱ्या आरोपीला मुंबई क्राईम ब्रँच कडून अटक !!
सिनेमा दिग्दर्शकाच्या घरावर बंदुकीने गोळीबार करणाऱ्या आरोपीला मुंबई क्राईम ब्रँच कडून अटक !!
मुंबईतील सिनेमा दिग्दर्शक दिग्दर्शक यांच्या घरावर अग्निशस्त्रातुन गोळीबाराच्या गुन्हयातील वॉन्टेड आरोपीस मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे.
दिनांक ०१/०२/२०२६ रोजी सिनेमा दिग्दर्शक यांच्या घरावर अग्निशस्त्रातुन गोळीबार झाल्याने सदर बाबत जुहू पोलीस ठाणे, मुंबई या ठिकाणी गु.र.क्र. १२६/२०२६ कलम १०९, ६१(२), २३८, ३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम ३, २५, २७ हत्यार कायदा सह कलम ३७(१), ३७(२), १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचा प्रकरण हे खंडणीचे असावे अशी कल्पना केली जात आहे.
नोंद गुन्हयाचा तपास खंडणी विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांच्यामार्फत सुरु होता. नोंद गुन्हयामध्ये सुरवातीस एकुण १४ आरोपींना अटक करण्यात आली होती. नोंद गुन्हयामध्ये मोक्का कायदयाचा समावेश करण्यात आला आहे. नमुद गुन्हयातील अटक आरोपी सद्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
नोंद असलेल्या गुन्हयामध्ये दिनांक १६/०४/२०२६ रोजी नमुद गुन्हयातील वॉन्टेड आरोपी नामे प्रदीपकुमार रामसिंग जाठव उर्फ गाठ, वय २२ वर्ष, यास बाह पोलीस ठाणे, जि. आग्रा, उत्तर प्रदेश, येथे अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीने गुन्हयाच्या घटनास्थळावर गोळीबार करण्या-या आरोपींसोबत समक्ष उपस्थित राहून गोळीबारासाठी इतर अटक आरोपींना चिथावणी देवुन सहाय्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.
अटक आरोपीला आज दिनांक १७/०४/२०२६ रोजी मा. विशेष मोक्का सत्र न्यायालय, कोर्ट क्रमांक ५७, मुंबई याठिकाणी रिमांडकामी हजर करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डी (मध्य) श्री. सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल काळे, व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडलेली आहे.