शौचालय हटऊन तर दाखवा, मनसेने दिला आंदोलनाचा इशारा !

शौचालय हटऊन तर दाखवा, मनसेने दिला आंदोलनाचा इशारा !

  लोअरपरळ विभागात चाळींचा पुनर्विकास होत असून, येथे कॉर्पोरेट कार्यालये मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे बाहेरून नोकरीसाठी व व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची ये जा सतत असते, त्याशिवाय भरपूर गर्दी असलेल्या ह्या विभागात स्टेशन ते शिवालय नाक्यापर्यंत एकमेव शौचालय आहे.

  वृद्ध, शालेय विदयार्थी व महिलांकडून या शौचालयाचा खूप वापर होत आहे, चाळींचा विकास करणारे विकासक व कॉर्पोरेट कार्यालयांना या शौचालयाची अडचण होण्याची शक्यता आहे व ते तोडण्याचा प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे, यापूर्वी डॉन मिल गणपतराव कदम मार्ग येथील जुने शौचालय भांडवलशाही च्या जोरावर कॉर्पोरेट वाल्यांनी हटविल्याची घटना ह्या पूर्वी घडलेली आहे,

  लोअरपरळ मध्ये वावरणाऱ्या जनतेने काय लघवीसाठी प्लास्टिक बाटली किंवा पिशवी घेऊन फिरायचे काय, असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरळी विभागाचे सचिव उत्तम सांडव यांनी यावेळी केला आहे. 

  सदर बाबतचे निवेदन पत्र सांडव यांनी सहाय्यक महानगरपालिका आयुक्त, जी दक्षिण विभागाकडे दिलेले आहे. व लोअरपरळ मधील हे एकमेव शौचालय हटविले गेल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांडव यांनी सांगितले.  

       


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week