सीताराम जाधव मार्ग व सेनापती बापट मार्ग जंक्शन वर गती रोधक बसवा - उत्तम सांडव मनसे सचिव !

सीताराम जाधव मार्ग व सेनापती बापट मार्ग जंक्शन वर गती रोधक बसवा - उत्तम सांडव मनसे सचिव !

  लोअरपरळ विभागाचा विकास झपाट्याने होत असताना व्यावसायिक हब, निवासी इमारती, आणि त्यात मोठ्या प्रमाणात नोकरी, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची वर्दळ वाढत चालली आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी विभागात होत आहे, 

 सीताराम जाधव मार्ग ते सेनापती बापट मार्ग जंक्शनवर एका बाजूने संथ गतीने वाहने येतात तर सेनापती बापट मार्गावरून मोठ्या प्रमाणात जलद गतिने वाहने येतात, त्यामुळे अपघात होत आहेत, यापूर्वी २ ते  ३ वेळा अपघात झालेले आहेत व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

   जंक्शनवर रम्बलर, गतिरोधक लावल्यामुळे अपघात होणार नाहीत. 

      अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरळी विभागाचे सचिव उत्तम सांडव यांनी जी साऊथ विभाग मुंबई महानगरपालिकेकडे केली आहे व त्या बाबतचे निवेदन पत्र सहाय्यक अभियंता (परीक्षण) जी साऊथ, महापालिका यांच्याकडे दिलेले आहे.

   पण सदर बाबत मोठया रस्त्यावर गतिरोधक नसावेत असे  मा. न्यायालयाचे निर्देश आल्यामुळे सदरचे काम रखडताना दिसत आहे असे सांडव यांनी सांगितले.

   


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week