प्रेम संबंधावरून तरुणीचा खून, वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !!
अटक आरोपी नामे रोहित यादव, राहणार हरियाणा व मयत मुलगी आरती यादव, राहणार उत्तरप्रदेश यांचे 06 वर्षांपूर्वी पासून प्रेम संबंध होते.
आरोपी रोहित यादव याने मयत मुलीस एक महिन्यापूर्वी एका खाजगी कंपनीत कामाला लावले होते. आरोपी हा मयत मुलीस रोज कामावर सोडण्यासाठी जात होता.
परंतु काही दिवसापूर्वी मयत मुलगी आरती यादव हिचे तिच्या कंपनीत एका दुसऱ्या मुला बरोबर प्रेम संबंध असल्याचे आरोपीला समजले होते. आणि मयत मुलगी ही आरोपी बरोबर बोलण्यास व फोन करण्यास टाळाटाळ करत होती.
त्या कारणावरून आज दिनांक 18.06.2024 रोजी सकाळी 08:45 वाजताचे सुमारास आरोपीने मयत आरती यादव हिचे डोक्यात लोखंडी पान्याने 12 ते 14 वेळा आघात करून, मारून तिचा खून केला आहे. त्याबाबत वसई येथे वालीव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 320/2024 भादवी कलम 302 प्रमाणे आज दिनांक 18.06.2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरबाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्याचा सविस्तर तपास चालू आहे.