ए चल ट्रेन मे हाथ मारेंगे ??

ए चल ट्रेन मे हाथ मारेंगे ??

        बांद्रा युनिट ६ लोहमार्ग मुंबई यांची उल्लेखनीय कामगिरी

ट्रेन मध्ये मोबाईल, लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्यास शिताफीने ठोकल्या बेड्या !!!!


     ३,०८,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत !!!


       ट्रेन मध्ये चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. रोज लाख लोक ट्रेन मधून प्रवास करीत असतात. महिला व पुरुष दोघानाही कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेन नेच जावे लागते. मुंबईची लाईफ लाईन असलेली मुंबई रेल्वे म्हणजे अतिशय गर्दीच ठिकाण.


       मग ह्या गर्दीचा फायदा चोरटे उठवत असतात. सकाळी नोकरवर्ग हा कामावर जात असताना आपले मोबाईल लॅपटॉप जवळ बाळगत असतात. येवढ्या गर्दीत कुणाचं कुणाकडे लक्ष नसते आणि मग चोरट्यांचे फावते.


        असाच ट्रेन मध्ये चोरी करणाऱ्याला बांद्रा युनिट ६ लोहमार्ग मुंबई यांनी अटक केली माहिती अशी की दिनांक १६/४/२०२४ रोजी १७ वाजून ५६ मिनिटांनी ते १९ वाजताच्या सुमारास श्री अँलिस्टर मायकल कुलासो वय वर्ष २५ धंदा नोकरी, रा.ठी.बून व्हीला माणिकपूर, नवपाडा, वसई, पश्चिम जि. पालघर हे चर्चगेट ते भाईंदर दरम्यान रेल्वे प्रवास करीत होते. प्रवासा दरम्यान त्यांनी आपली लॅपटॉप असलेली बॅग रेल्वेच्या रॅकवर ठेवली होती. सदर बॅग चोरट्यांनी लबाडीने चोरून नेल्याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसई रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र. ४२२/०२४ कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


       गुन्ह्याचा तपास नीट सहा मांजरा लोहमार्ग मुंबई यांच्या तर्फे करण्यात आला होता. तपासा दरम्यान येथे अज्ञात आरोपी ह्याच्यावर विविध लॅपटॉप मोबाईल चोरीचे होणे यासाठी वेगवेगळ्या रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते.


    त्या सर्व गुन्ह्याचा तपास करून यात पुढील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी सिकंदर कुमार राजकुमार राम वय वर्ष २८ राहणार ठिकाण खेतवाडी अकरावी गल्ली, भाजी मार्केट जवळील बाथरूम जवळ ग्रँड रोड, मुंबई पूर्व. मुळगाव कटारी तालुका गरौर, पो ठा. छबीलपु जिं. नालंदा, राज्य बिहार याला बेड्या ठोकल्या. आरोपी सिकंदर वर अनेक रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.


     त्याच्याकडून वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे लॅपटॉप किमान ७०००० रुपये, बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे ५०००० रुपये किमतीचा लॅपटॉप, मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे ५५००० रुपये किमतीचा लॅपटॉप, अंधेरी पोलीस ठाणे रेल्वे ६०००० रुपये किमतीचा लॅपटॉप, अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे १८०००० रुपये किमतीचा मोबाईल, अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे येथे २३००० रूपये किमतीचा मोबाईल, बांद्रा रेल्वे पोलीस ठाणे ३२००० रुपये किमतीचा मोबाईल इत्यादी ठिकाणाहून लॅपटॉप व मोबाईल चोरीचा माल हस्तगत केला आहे.


           सदरची कामगिरी डॉक्टर रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त मुंबई लोहमार्ग, पोलीस उप आयुक्त मध्य परिमंडळ श्री मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री राजेंद्र रानमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्शुद्दिन शेख,पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत भूपेंद्र टेलर, सहाय्यक पोलीस फौजदार गणेश शिरसागर, रवींद्र दरेकर, पोलीस हवालदार महेश सुर्वे, सोमनाथ गायकवाड, प्रशांत साळुंखे, सुरेश एल्ला, पोलीस नायक सिकंदर तडवी, सत्यजित कांबळे, अमरसिंह वाळवी, पोलीस अंमलदार सागर हीगे, अक्षय देसाई, सुनील मागाडे तसेच आर पी एफ विभाग बांद्रा यांनी केली.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week