दोस्त दोस्त ना रहा..!!
मित्राचा खून करून फरार झालेल्या आरोपीतास केले हरियाणा येथून अटक!
दिनांक १० मे रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्ग, मुंबई वाहिनीलगत सोपारा फाटा नालासोपारा पूर्व ता वसई जिल्हा पालघर येथे रस्त्यावरील एका नाल्यात एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. सदर मृतदेहाची ओळख पटत नसल्याने बेवारस अकस्मात मृत्यू सीआरपी १७४ अन्वये दाखल करून तपासणी सुरू करण्यात आली होती.
सदर अकस्मात मृत्यूचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांनी सदर मृत्यू मधील मयताची ओळख पटत नसल्याने सखोल चौकशीचे आदेश कुमार गौरव धादवड, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक भोपळे यांना दिले होते.
त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाने अकस्मात मृत्यूची चौकशी सुरू केली. चौकशी करीत असताना मयत इसमाच्या पँन्ट मधे एक चिट्ठी मिळाली, सदर चिट्ठी वरून मयत इसम हा ESEL स्टुडिओ ट्रॉम्बे मानखुर्द वाशी येथे शूटिंगच्या कामासाठी ज्युनिअर आर्टिस्ट पुरविण्याचे काम करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यावर मिळालेल्या माहिती वरून सदरचा मृतदेह हा संतोष कुमार यादव असे मयत इसमाचे नाव असल्याचे सिद्ध झाले.
संतोष कुमार याच्या नातेवाईका मार्फत सदर मृतदेहाची ओळख निष्पन्न झाली. संतोष कुमार यादव याच्या शवविच्छेदन अवहालामध्ये त्याच्या मृत्यूचे कारण हे "हेड इन्जुरी" असे आल्याने पेल्हार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संभाजी मुंडे यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने, अज्ञात आरोपी यांच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाणे यांनी भारतीय दंड विधान कलम ३०२,२०१ अनव्ये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तांत्रिक माहिती गोळा करुन आरोपी याचा तांत्रिक बाबीवर गुप्त बातमीदार यांच्या माहितीवर आरोपी सनी सुनील सिंग याचा साथीदार राहुल सोहंन पाल हा गुन्ह्याची नोंद झाल्यापासून फरार झाला होता.
सदर गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी राहुल सोहं पाल वय वर्ष २६ यास दिनांक १४/०५/२४ रोजी अटक करण्यात आली होती. आरोपी बद्दल तांत्रिक माहिती गोळा करून शोध घेत असताना आरोपी हा सेक्टर नो ५८, फरिदाबाद पोलीस ठाणे हद्दीत, जाजरू फरिदाबाद हद्दीत असल्याचे समजले.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला असता आरोपी राहुल सोहन पाल यास दिनांक ७/६/२४ रोजी अटक करण्यात आली.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांण्डेय, अपर पोलीस आयुक्त श्री श्रीकांत पाठक, पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ विरार श्री जयंत बजबळे, सहायक पोलिस आयुक्त श्री बजरंग देसाई विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे, श्री कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे, श्री शकील शेख पोलीस निरीक्षक प्रशासन, पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सोपान पाटील, सहायक पोलिस उप निरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पो अंमलदार रवी वानखेडे, मिथुन मोहिते, किरण आव्हाड, राहुल करपे, निखिल मंडलिक, दिलावर शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, अभिजित नेवारे, सर्व नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे, नामदेव ढोणे, सोहेल शेख यांनी पार पाडली.