मयुरी मंगेश सुर्वे (तृतीयपंथी) यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष - ट्रान्सजेंडर विंग या पदासाठी नियुक्ती !!

मयुरी मंगेश सुर्वे (तृतीयपंथी) यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष - ट्रान्सजेंडर विंग या पदासाठी नियुक्ती !!

दिनांक ४ फेब्रुवारी रोजी मुंबईत नॅशनल अँटी क्राइम अँड ह्युमन राइट्स ऑफ इंडिया संस्थेच्या वतीने संस्थापक श्री. जॉन सॅम्युअल किम जे व श्रीमती सविता गोंड राष्ट्रीय सरचिटणीस - विश्वस्त मंडळ, श्री. गुलाब पडवळ राष्ट्रीय उपाध्यक्ष, श्री. रमाकांत साळवे महाराष्ट्र राज्य चैअरमन आणि श्री जोसेफ झेवियर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या वतीने मयुरी मंगेश सुर्वे (तृतीयपंथी) यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष - ट्रान्सजेंडर विंग या पदासाठी नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र देऊन नेमणूक करण्यात आली.


        नॅशनल अँटी क्राइम अँड ह्युमन राइट्स ऑफ इंडिया हि संस्था विविध सरकारी विभागांतर्गत आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत आहे. 

        मानवाधिकार, दलित हक्क, कामगार, बालमजुरी, ग्राहकांशी संबंधित मुद्दे, पोलिस अत्याचार, बलात्कार, लैंगिक छळ याविरोधात तातडीने पावले उचलते, पर्यावरण तपासणी करणे, मनी लाँडरिंग (हवाला), गुन्हे आणि भ्रष्टाचार, सिंडिकेट, रॅकेट्स, संघटित टोळक्यांच्या तस्करीच्या विरोधात कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहे.


सेवानिवृत्त सरकारी अधिकारी, माजी न्यायाधीश, वकील (सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, लोअर कोर्ट, डॉक्टर आणि अभियंता, धर्मादाय लेखा, शैक्षणिक, व्यावसायिक, पत्रकार, नोकरशाह, कलाकार यांच्यासह) स्थानिक व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे.



Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week