भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करावा !!

भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करावा !!

       आज सर्वच ठिकाणी आपल्याला काही जण भूतदया म्हणून काही जवळच्या तर काही विशेष प्राण्यांना सांभाळताना दिसत असतात, त्यात सेलिब्रिटी तसेच लोकप्रिय व्यक्ती मागे नाहीत. ते त्या प्राण्यांची विशेष काळजी घेत असतात व आपल्या मर्यादेत ठेवतात. परंतु सर्वच जण अशी काळजी घेत नाही किंवा त्यांना घेता येत नाही यासाठी कारण निष्काळजीपणा किंवा परिस्थिती असू शकते. आपल्या सभोवताली रात्री अपरात्री फेर फटका मारला असता कुत्री भुंकताना ऐकू येत असतात, विनाकारण ही कुत्री कुणाच्याही अंगावर धावून येत असतात व हल्ला करतात, अगदी समज नसलेला प्राणी असून याला मुक म्हणून समजण्याची चूक कुणीही करू नये. स्वतःहून अशी कृत्ये करणाऱ्याला आपण शिक्षा करतो. पण या प्राण्याला आपण सोडून देतो व पाळीव असेल तर त्याचा मालक त्याची बाजू घेतो, त्यामुळे विनाकारण चा त्रास सामान्य माणसाला सहन करावा लागतो. यात आपण जखमी होण्याची पूर्ण शक्यता असते. कुत्रा हा खूप संवेदनशील प्राणी आहे व हिंस्त्र सुधा, त्यामुळे हा आपल्याला फायदेशीर ठरण्या ऐवजी धोकादायक च जास्त ठरतोय. असा प्राणी असून याचा काही जण पाळीव म्हणून सांभाळ करतात. त्यांना काही ठिकाणी शिकवण सुद्धा दिलेली असते. पण भटक्या कुत्र्यांना शिकवण दिलेली नसते. इमानदार म्हणून तो सर्वश्रुत आहेच पण फक्त आपल्या ओळखीच्या तसेच मालकांसाठी, कधीकधी तो ओळखीच्या लोकांच्याही अंगावर धावून जातो व तो याप्रकारे धोकादायक ठरतो. त्यांचे मालक हे त्यांना त्यांच्या गळ्यात पट्टा न बांधता त्यांना सार्वजनिक ठिकाणी, आपल्या राहत्या ठिकाणच्या आवारात फिरवत असतात. याममुळे कुठेही घाण होते. तो इतरांच्या अंगावर धावून जातात तेव्हा त्यांचे मालक तो काही नाही करत असे म्हणतात. पट्याचे नियम पायदळी तुडवले जातात. हे खूप गंभीर आहे, कारण सामान्य माणस दुबळी, आजारी, दुखापत ग्रस्त असू शकतात. ते पटकन धावू शकत नाही व त्यामुळे त्यांना त्याच्या हल्ल्याचा बळी व्हावेच लागेल. ज्या प्राणी मित्रांना काळजी वाटत असेल त्यांनी त्याची वेगळी विशिष्ट व्यवस्था करावी व सांभाळावे. सामान्य माणूस रोजच्या जीवनात याला सहन करू शकत नाही. 

        दि.15 ऑक्टोबर 2023 रोजी वाघ बकरी चहा' समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई हे सकाळी मार्निंग वॉक करत असताना कुत्रे अंगावर धावून आल्याने पराग देसाई पडले व त्यांना डोक्याला मार लागून ब्रेन हॅमरेज झाले व त्यात त्यांचे निधन झाले, ही किती लाजिरवाणी व गंभीर बाब आहे. हा आपल्यासाठी धडा व सूचना आहे. थोडक्यात आपण याबाबत गाफील आहोत की हे कुत्रे म्हणजे नक्की कोण आहेत याचा सोक्षमोक्ष घ्यावा. यावर सखोल अभ्यास करून यावर वेळीच तोडगा काढला पाहिजे. फक्त कुत्र्यांमुळे आपले बरे वाईट व्हावे यापेक्षा दुर्दैव ते काय? 

       तरी भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी योग्य तो बंदोबस्त करावा व ते सामान्य ठिकाणी दिसू नयेत याची काळजी घ्यावी.  याला पाळीव संवर्गातून बाहेर करून पाळण्याची परवानगी देऊ नये, यावर उच्चस्तरीय विचार होऊन नवीन विशेष कुत्रा अभयारण्य उभारावे व सर्व कुत्र्यांना त्यात एकत्र ठेवावे, ही नम्र विनंती.

         (सुनील पांचाळ - माझगाव मुंबई)


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे