
प्रा. डॉ गजानन शेपाल यांच्या रंगसभा ग्रंथाचे प्रकाशन !!
सर जे जी उपयोजित कला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक आणि कलाविषयक स्तंभलेखक प्रा. डॉ. गजानन शेपाल यांच्या रंगसभा या ग्रंथाचे प्रकाशन शनिवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि एस व्ही एस कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमास संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस, डॉ उत्तम पाचारणे, अधिष्ठाता डॉ संतोष क्षीरसागर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कला महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास कलाप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी केले आहे.