वरळी म्हणजे.....??????

वरळी म्हणजे.....??????

    खळाळत्या जीवनाचा निर्झर म्हणजे वरळी !

मनातल्या माणुसकीचा पाझर म्हणजे वरळी

वरळी सी-फेसवरचा वारा म्हणजे वरळी

अन् थंडीत घामाच्या धारा म्हणजे वरळी

पोद्दार गल्लीतली तरुणाईची मस्ती म्हणजे वरळी

अन् MILAN PUNJAB च्या जेवणानंतरची सुस्ती म्हणजे वरळी..

वरळी नाका, ५२ चाळ म्हणजे वरळी..

रात्रीची पाव-भाजी अन् भुर्जी-पाव म्हणजे वरळी..

सायकलवरची चहा म्हणजे वरळी .

फुटपाथवरची भाजीवाल्यंची गर्दी म्हणजे वरळी..

बी.डी.डी. चाळी म्हणजे वरळी..

मुंबईतले प्रेक्षणीय शहर म्हणजे वरळी..

गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या आपल्या लोकांचे घर म्हणजे वरळी

सकाळ संध्याकाळ धामधुमीने भरलेले शहर म्हणजे वरळी

अन् जांबोरी मैदानातला क्रिकेट म्हणजे वरळी

वडा-पाव अन् वैशालीतली मिसळ खाणारी………… . झणझणीत वरळी

अन् १० वी १२ वी मध्ये यश मिळवणारी………… ……… …. दणदणीत वरळी

गुढीपाडव्याला लेझीमवर नाचणारी सांस्कृतिक वरळी..

दहीहंडीला उंच थर लावणारी आमची वरळी...

कृष्णोकृष्णी , जिथे-तिथे कधी चिडलेली तर कधी चिडवलेली वरळी..

कधीमेंगाळलेली, कधी नटलेली, कधी नडलेली, कधी नाडलेली,

तरी आनंदाने आणि गर्दीने फुललेली मुंबईची शान म्हणजे वरळी.....


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week