
कुलाब्याच्या मच्छीमार नगरातील फुटबॉल खेळाडू ऍडलेड सिटी ऑस्ट्रेलिया येथे खेळणार....
कुलाब्याच्या मच्छीमार नगरातील फुटबॉल खेळाडू ऍडलेड सिटी ऑस्ट्रेलिया येथे खेळणार....
मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबातील उदयमुख खेळाडू कुमार अनिकेत रवींद्र पांचाळ यांची ऍडलेट सिटी ऑस्ट्रेलिया या संघाच्या तीन महिन्याच्या सराव शिबिरा करिता निवड झालेली आहे कुमार अनिकेत रवींद्र पांचाळ हा होतकरू खेळाडू असून त्याने मुंबई तसेच महाराष्ट्र संघाचे संतोष ट्रॉफी स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले आहे. त्याचप्रमाणे भारतीय संघाच्या सोळा वर्षाखालील संघात सुद्धा कुमार अनिकेत रवींद्र पांचाळ यांनी नेतृत्व केलेले आहे.
गेल्या दोन मोसमांपासून तो मुंबईच्या केकरें फुटबॉल क्लब संघातर्फे हिरो आय लीक 2021 ते 2022 करिता नेत्रद्वीप खेळ केलेला असून एका सामन्यात हिरो ऑफ द मॅच चा किताब सुद्धा त्याला मिळालेला आहे. एडलेट सिटी संघाच्या सराव शिबिराकरिता अनिकेत पांचाळ ऑस्ट्रेलिया येथे चार जून रोजी रवाना झाला असून तेथून आल्यानंतर नक्कीच त्याला त्याच्या शिबिराचा लाभ फायदा होणार आहे. तसेच अँड लेट सिटी संघ त्यास वर्ष 2023 2024 मोसमाकरिता करारबद्ध करण्याचा विचार करत आहे.
अनिकेत सारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या फुटबॉल खेळाडू करिता नक्कीच ही अभिमानास्पद गोष्ट आहे. क्षमता आहे परंतु योग्य संधी मिळाली तर संधीचं सोनं करण्याची जिद्द ही अनिकेत सारख्या सर्व खेळाडूंच्या मध्ये आहे ही बाब भारतीय खेळाडू तसेच मुंबईतील सर्वसामान्य झोपडपट्टीत खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. चिकाटी असेल व खेळात सातत्याने चांगली कामगिरी कायम ठेवली तर मुंबईतील झोपडपट्टीत खेळणाऱ्या सर्वसामान्य खेळाडूंना सुद्धा उंच भरारी घेता येऊ शकते हे अनिकेत सारख्या खेळाडूंनी दाखवून दिलेले आहे.