
पावसाळा सुरु होण्यापूर्वी करावयाच्या उपाययोजना तातडीने करा - आमदार सुनिल शिंदे
पावसाळा सुरु होण्यापूर्वी करावयाच्या उपाययोजना तातडीने करा - आमदार सुनिल शिंदे
पावसाळा सुरु होण्यापूर्वी करावयाच्या उपाययोजना तातडीने करा - आमदार मा. सुनिल शिंदे यांची महानगरपालिका प्रशासनाला पत्राद्वारे सूचना !
पावसाळ्यापूर्वी जी/दक्षिण प्रभागातील पर्जन्य जलवाहिनी जाळ्यांची दुरुस्ती तसेच साफसफाई तातडीने करावी व रस्त्यावरील खड्यांमुळे पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी विभागातील सर्व रस्त्यांची डागडुजी करून तातडीने खड्डे बुजवण्यात यावेत. पावसाळयात रस्त्यावरील तसेच विभागातील धोकादायक झाडांमुळेही अपघात होण्याची शक्यता असते अशा झाडांची नियमोचित छाटणी करावी.
जी-दक्षिण विभागात पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. यामध्ये विशेषतः डिलाईल रोड येथील सखुबाई मोहीते मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी बी.डी.डी. चाळ परिसर, सातरस्ता येथील शांतीनगर परिसर, सिताराम जाधव मार्ग (सनमिल गल्ली) या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे येथे विशेष लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना जी-दक्षिण सहाय्यक आयुक्तांना पत्राव्दारे दिल्या आहेत.