
मुंबईत जाचक ठरत असलेल्या 'मुंबईत सरकारी योजनेत एकच घर' या निकषात आमूलाग्र बदल करावा - आमदार सुनिल शिंदे यांची मा. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री यांना पत्राद्वारे विनंती !!
मुंबईत जाचक ठरत असलेल्या 'मुंबईत सरकारी योजनेत एकच घर' या निकषात आमूलाग्र बदल करावा - आमदार सुनिल शिंदे यांची मा. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री यांना पत्राद्वारे विनंती !!
गिरणी कामगार योजनेत म्हाडाचे घर मिळाले असल्यामुळे एका गिरणी कामगाराच्या वारसदाराला एसआरए प्रकल्पातील घर घेता येईल का ? याबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले असल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. एसआरएने याबाबत गुणवत्तेवर निर्णय घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सरकारी योजनेत एकच घर घेण्याचा निकष मुंबईत सर्वत्र लावल्यास हजारो गिरणी कामगारांना एसआरए किंवा खासगी प्रकल्पात असलेली घरे गमावण्याची भीती निर्माण झाली आहे. यास्तव सदर प्रकरणाचे गांभीर्य जाणून घेवून सर्वसामान्य मुंबईकरांना जाचक ठरत असलेल्या ‘मुंबईत सरकारी योजनेत एकच घर’ या निकषात आमुलाग्र बदल करण्याबाबत मा. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री यांना पत्राद्वारे विनंती आमदार सुनील शिंदे यांनी केली आहे.