शिवसेना शाखा क्र. १९५ (माधव भुवन) च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन !

शिवसेना शाखा क्र. १९५ (माधव भुवन) च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन !

  दि. २३ जानेवारी रोजी सालाबाद प्रमाणे हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्ताने लोअरपरळ शिवसेना शाखा क्र. १९५ (माधव भुवन) च्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.

  सदर कार्यक्रमात सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत लिटल बर्डस नर्सरीतील लहान मुलांसाठी खाऊ व शालेय साहित्य वाटप करून, मुलांची छोटी सहल घेतली जाऊन ममता दिन साजरा केला.

  दुपारी १ वाजता माधव भूवन परिसरातील जवळपास १०० जेष्ठ नागरिकांना बॅग वाटप करून सत्कार करण्यात आले.

    १० व १२ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन सत्कार करण्यात आला.

    शिवजयंतीही साजरी करण्यात आली.

    अशा ह्या कार्यक्रमाचे सलग हे चौथे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम मी व माझे सर्व सहकारी मोठ्या उत्साहात करतो, असे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक उपशाखाप्रमुख प्रकाश जळगावकर यांनी सांगितले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week