पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्थानकावर सरकत्या जिन्याची (Escalator Stairs) व्यवस्था करा - आमदार सुनिल शिंदे यांची मागणी !!

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्थानकावर सरकत्या जिन्याची (Escalator Stairs) व्यवस्था करा - आमदार सुनिल शिंदे यांची मागणी !!

        पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्थानकावर पूर्व -पश्चिम बाजूला जोडणाऱ्या पादचारी पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवाशी तसेच प्रवासी करत असतात. यात अनेक जेष्ठ नागरिक, रुग्ण व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या पुलाची उंची व लांबी पाहता या पुलावरील प्रवास हा जेष्ठ नागरिक, रुग्ण व विद्यार्थ्यांसाठी दमछाक करणारा आहे. यास्तव लोअर परळ रेल्वे स्थानकावर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सरकत्या जिन्याची (Escalator Stairs) सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून लोअर परळ मधील रहिवासी व रेल्वे प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येईल, अशी मागणी शिंदे यांनी सबंधित प्रशासनाकडे केली आहे.



(सौजन्य - प्रसाद सावंत)


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week