मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील निवृत्त शिक्षक व पालिका कर्मचारी यांना निवृत्तीपर मिळणारे लाभ तातडीने द्या - आमदार सुनिल शिंदे !!

         मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांना सन २०१६ पासून ७ वेतन लागू झालेला आहे. सन २०१६ मध्ये निवृत्त झालेले सुमारे ३००० शिक्षकाना ७ वेतन आयोगाचा लाभ अद्यापही मिळालेला नाही. याची दखल घेवून शासनाने सन २०१६ मध्ये निवृत्त झालेल्या ३००० शिक्षकांना तातडीने सातव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा.

       मुंबई महानगरपालिकेने प्रणालीत अद्ययावत बदल न केल्याने सुमारे ८०० हून अधिक सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर तातडीने मिळणाऱ्या लाभांपासून वंचित आहेत. मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना निवृत्तीपर मिळणारे लाभ वेळेवर मिळण्यासाठी प्रणालीत अद्ययावत बदल तातडीने करण्यात यावेत अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी अधिवेशनात केली.

(सौजन्य - प्रसाद सावंत)


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week