वरळी डेअरी वसाहतींचा बीडीडी चाळींच्या धर्तीवर पुनर्विकास करावा - पुरवणी मागण्यावर चर्चा करताना आमदार सुनिल शिंदे यांची मागणी !

       वरळी डेअरी येथील वर्ग ३ आणि वर्ग ४ ची निवासस्थाने असलेल्या इमारती अत्यंत धोकादायक झाल्या आहेत. या ठिकाणी वर्ग ३ ची निवासस्थाने असलेल्या ८ इमारती आणि वर्ग ४ ची निवासस्थाने असलेल्या १४ इमारती आहेत. या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले असून त्यात या इमारतींची तातडीने संरचनात्मक दुरुस्ती करणे, गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. परंतु या इमारतींच्या दुरुस्तीसाठी विभागाकडून निधीच उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यामुळे इमारतीत वास्तव्य करणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.  याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी मा. आदित्यजी ठाकरे यांनी आयुक्तांना पत्रव्यवहार देखील केला आहे.

     शासनाने बी.डी.डी. चाळीच्या धर्तीवर या इमारतींचा विकास करावा जेणेकरून नव्या पध्दतीने अनेक शासकीय इमारती उभ्या राहतील. तरी शासनाने वरळी डेअरीच्या कर्मचारी वसाहतीतील इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा.

(सौजन्य :- प्रसाद सावंत)


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week