
पत्रकार बाळ पंडित यांचा सत्कार !
आर्थर रोड नका येथील, श्री स्वामी कट्टा परिवारांच्या वतीने ज्येष्ठ स्वामी भक्तांसाठी धार्मिक सहलीचे आयोजन केले जाते, या वर्षी कट्टा परिवांच्या वतीने प्रति शिर्डी (पनवेल), श्री स्वामी समर्थ मठ (लोणावळा), गगनगिरी महाराज आश्रम (खोपोली), श्री गणेश मंदिर (महड), येथे धार्मिक सहलीचे आयोजन केले होते. लोणावळा येथील श्री स्वामींच्या मठात, कट्टा परिवाराच्या वतीने जप, नाम स्मरण व भजन करण्यात आले. तद प्रसंगी श्री स्वामी कट्टा परिवाराचे अध्यक्ष- बाळ पंडित यांचा सत्कार करण्यात आला. धार्मिक सहल आयोजनासाठी चिटणीस-राजेंद्र चव्हाण, कोषाध्यक्ष-रवींद्र रेवडेकर, कार्याध्यक्ष-भास्कर साळुंके सह सूर्यकांत नाचरे, सागर मेस्त्री, मनोज पाठक, नितीन रोमन, जगदीश सावंत, संतोष सावंत, विजय लोंढे, जयसिंग परब, आदी स्वामी भक्तांनी फारच मेहनत घेतली.