
११ जुर्ले जागतिक लोकसंख्या दिन !!
अकरा जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळण्यात येतो. जगाची लोकसंख्या किती आणि कशी वाढत आहे. त्याचे भविष्यकाळात काय परिणाम होतील. वाढत्या लोकसंख्येला आवश्यक असलेल्या मुलभूत सोयी पुरविण्यासाठी काय काय करावं लागेल याचा अंदाज जनगणनेनं शासन स्तरावर करता येतो. त्यामुळे देशातील पुरूष, स्त्रीया, मुलं, वृध्द् माणसं यांची नेमकी आकडेवारी मिळते. जनगणनने बरोबरच साक्षरता, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती यांचीही कल्पना शासन पातळीवर येत असते. औद्योगिक व पंचवार्षिक योजनांचा तपशील ठरविण्यात उपयुव-त माहिती या जनगणनेच्या आधारेच शासनाला मिळत असते. त्याच आधारे विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. हे काम राष्ट्रिय दृष्या अत्यंत महत्वाचे असते. यावर राष्ट्राचे भावी नियोजन आखायचे असते. शासन, विद्यापिठे, वेगवेगळे उपक्रम, पालिका यासारख्या अनेकांना या माहितीचा उपयोग करून काही निष्कर्ष काढता येतात. जनगणना अहवाल म्हणजे माहितीचे भांडार आहे.
(सौजन्य - सुनिल गोपाळ पांचाळ)